ओ बाबा, मला मारा
एकदा तरी मारा ना
काच तोड्ण्य्साठी
पैसे हरवण्यासाठी
मस्ती करण्यासाठी
खोटं बोलण्यासाठी
एकदा मारा ना
ऑफिसच्या वैतागाच
ताईच्या लग्नाचं
माझ्या भविष्याचं
टेनशन माझ्यावर काढा ना
ओ बाबा, एकदा मारा ना
काठी घेऊन मारा
पट्ट्याने मारा
काही नाही मिळालं तर
हाताने तरी मारा
एकदा तरी मारा ना
संध्याकाळी मारा, वेळ नाही
तर रविवारी मारा
मी खेळून आल्यावर मारा
हवं तर मी खेळायलाच नाही जाणार
पण एकदा मारा ना
मारून झाल्यावर मात्र
एकदा मिठीत घ्या ना
शंभर फटके मारा
पण डोक्यावरून हात फिरवा ना
ओ बाबा, एकदा हात फिरवा ना
ओ बाबा, मला मारा
एकदा मारा ना
मारण्यासाठी का होईना
जवळ एकदा तरी घ्या ना
ओ बाबा, please एकदा मारा ना
~ सप्या ~
Dedicated to my Dad. Love you Dad. :-)
No comments:
Post a Comment