विचारांच्या ओघात सरकन एक विचार निसटला
चिंब भिजुनी या पावसात मी का सुकलेला
आठवणीत तुझ्या अजून ही प्रत्येक क्षण दाटलेला
कुशीत तुझ्या आज ही हा देह निजलेला
नदीच्या काठावर अजून ही तुझीच सावली
विसरून जगाला का आठवण तुझीच राहिली
आजही डोळ्यात आहेत स्वप्नं जी आपण पाहिली
आजही ही अश्रुधारा तुलाच वाहिली
Smiles,
Swapnil..
Smiles,
Swapnil..
No comments:
Post a Comment